Thursday, February 23, 2017

बर्फाचे गाणे

शुभ्र बर्फ सर्वदूर गगन तेवढे मुके
पर्णहीन चांदण्यात वृक्ष दोन पोरके
पांढरी मधुर ओळ पापणी हळू मिटे
दरीस टाकुनी उभे नगण्य गाव एकटे
मला भरून ने पुढे अजाण शुष्क गारवा
अश्वगुम्फिल्या रथात मृत्युगंध ये नवा
तुडुंब प्रार्थनांतले मनस्वी जन्म नादती
चितेत माणकांपरी जशी लखाकते सती
निजलेल्या तिच्या परीस शब्द फक्त मोकळा
ईश्वरा जसा तुझा उदास रंग सावळा
प्राण पेरील्यापरी हिमात हाक सापडे
देह्पात्र आणिलेच मोज यातले तडे...!
- ग्रेस
चंद्रमाधवीचे प्रदेश

No comments:

Post a Comment