Skip to main content

Posts

Showing posts from January, 2017

डहाळी

रुजू झालें रुजावया 
चोचीचोचीतले बीज 
बीज लवता लवता 
पाखरांची उडे नीज . 

दूर उडाली पांखरे 
आणि आरासले माळ ;
रानफुलांनी फुलत्या 
तुडुंबले डोही जळ . 

फुलपाखरे आलेली 
झाली भुई मध उष्टी ;
पाचोळ्यानें वडावर 
काष्ठ झाले आहे कष्टी 

: डहाळी 
: जोगवा 
: आरती प्रभू

घोट गढूळले पुरे

हरवला कुठे कसा 
एका रात्रीतच शेला ;
रंग लागलेला आहे 
टिप्पणीच्या लेखणीला . 

पेला भरलेले पाणी 
निळ्या छटांनी अपुरे ;
पुढे चढताच ओठा 
घोट गढूळले पुरे . 

खाट करकरे जेथें 
तेथे उन्हे चाळवली ;
आणि उरलेली सुते 
सुतेसुद्धा मावळली . 

: घोट गढूळले पुरे . 
: जोगवा 
: आरती प्रभू

अशा वेळी

धूप जळतो रक्तांत,
धूर भिडतो चंद्रास ,
थेंबे थेंबे झोम्बे जळ  
पापण्यांस कासावीस. 

अशा वेळी बासरीला 
कळे भैरवीचा सूर 
(परि जागे 
 कुठे तरी 
कुढणारें कुणी तरी 
शाप लाख सोसणारे )
घेई ठाव काळजाचा 
पुन्हां वादळाला तीर . 

अशा वेळी ,
अशा पिशा वेळी 
काळजाच्या कळ्याकळ्या 
साती रंगे ओथंबती . 
जित्याजागत्या मरणा 
मिठ्या घालून फुलती . 

: अशा वेळी 
: जोगवा 
: आरती प्रभू

बिलंदर

अखेरच्या तळावर 
   म्हटले मी तिला 
आता तरी सोडूनिया 
   जाशील का मला ?

मान खाली घालोनि ती 
   नम्ब्रपणे  म्हणे 
आता तर पुण्य आहे 
   सतीचेच उणे !

: बिलंदर 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज

तीन कणिका

उगाच गहिवर उरात दाटे 
उगाच किणकिणती मनतारा 
     उगाच एकाकीपण वाटे 
समीप येथून काय किनारा !


हिशेब झाले चुकते काही 
काही अर्धे तसेच उरले 
     काय करू मी ऋणदात्यांनो 
थैलीतील मुद्दल सरले . 


म्हणायचे ते म्हणता म्हणता 
संकोचाने आम्ही अडलो 
     आणिक नंतर प्रतीक स्वरूप 
इत्यादींचा तंबू पडतो 


: तीन कणिका 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज

रूह देखी है कभी रूह को महसूस किया है ?

रूहदेखीहैकभीरूहकोमहसूसकियाहै ? जागतेजीतेहुएदुधियाकोहरेसेलिपटकर साँसलेतेहुएइसकोहरेकोमहसूसकियाहै ? याशिकारेमेंकिसीझीलपेजबरातबसरहो औरपानीकेछपाकोंमेंबजाकरतीहूँटलियाँ सुबकियांलेतीहवाओंकेवहबेनसुनेहैं ? चोदहवींरातकेबर्फाबसेइसचाँदकोजब ढेरसेसाएपकड़नेकेलिएभागतेहैं तुमनेसाहिलपेखड़ेगिरजेकीदीवारसेलगकर अपनीगहनातीहुईकोखकोमहसूसकियाहै ? जिस्मसौबारजलेफ़िरवहीमिटटीकाढेला रूहएकबारजेलेगीतोवहकुंदनहोगी रूहदेखीहै ,कभीरूहकोमहसूसकियाहै ?  : गुलजार

मार्ग

चालतो मी सारखा हा 
चालण्याला अंत नाही 
चालतो कोठे कशाला 
हीहि आता खंत नाही 

एकदा पूर्वी मलाही 
वेड होते शोधण्याचे 
वेदनेवाचून काही 
लाभ झाला त्यात नाही 

जाणत्या थोराकडेही 
खूप केली चौकशी मी 
शब्दजालातून कळले 
अज्ञतेला पार नाही 

योजनेचा या नकाशा 
ज्या ठिकाणी ठेवलेला 
खंदकाने वेढलेल्या 
त्या स्थळाला दार नाही 

ना कळावे हीच इच्छा 
जो कुणी आहे तयाची 
शोधता त्याच्या कृपेचा 
शोधका आधार नाही 

मी म्हणोनी सोडला तो 
नाद आता मंझिलाचा 
चालण्याचे श्रेय आहे 
अन्य धर्माचार नाहीं. 

: मार्ग 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज नाटक

नाटक सारे असेल , किंवा -
आहे नाटक याविषयी मज 
     शंका नाही 

काळोखाच्या पायपथाने 
आलेल्या मज मुसाफिरावर 
जीव वहावा इतुका यास न 
     कारण काही 

आहे नाट्यच , परंतु असल्या 
चतुरपणाच्या महिरापीने 
असेल मंडित , तर तिकिटाचा 
माझ्याजवळी -
     हिशेब नाही !

: नाटक 
: हिमरेषा 
: कुसुमाग्रज