Skip to main content

Posts

Showing posts from May, 2016

अंतराय

आर्द्र हवी चंद्ररात 
मेघावळ रजतरंग 
किणकिणत्या किरणांवर 
स्वरगंधित अंतरंग !

आणि दूर मिटलेली 
क्षितिजाची शून्य नजर 
तृप्तीने तुटलेला 
रात्रीचा भव्य प्रहर … 

जळ दिठीत निजलेले 
ओंजळीत फक्त पाय 
तू जळता माझा हो 
तेजस्वी अंतराय !

: अंतराय 
: सांजभयाच्या साजणी 
: ग्रेस

उपननी उपननी

उपननीउपननी आतांघ्यारेपाट्याहातीं राहाआतांउपन्याले उभेतिव्हारीवरती चालयेरेयेरेवार्या, ये

आला आला शेतकर्या

आलाआलाशेतकर्या पोयाचारेसनमोठा हातींघेईसनवाट्या आतांशेंदूरालेघोटा आतांबांधारेतोरनं सजवारेघरदार कराआंघोयीबैलाच्या लावाशिंगालेशेंदुर लावाशेंदूरशिंगाले शेंव्याघुंगराच्यालावा गयामधींबांधाजीला घंट्याघुंगरूमिरवा बांधाकवड्याचागेठा आंगावर्हेझूलछान माथांरेसमाचेगोंडे चारीपायांतपैंजन उठाउठाबह्यनाई, चुल्हेपेटवापेटवा आजबैलालेनीवद पुरनाच्यापोयाठेवा वढेनागरवखर नहींकष्टाले

माझं इठ्ठल मंदीर

माझंइठ्ठलमंदीर अवघ्याचंमाहेर माझंइठ्ठलरखूमाई उभेइटेवर टायवाजेखनखन मुरदुगाचीधुन तठेचाललंभजन गह्यरीगह्यरीसन टायकर्याचाजमाव दंगलादंगला तुकारामाचाअभंग रंगलारंगला तुम्हीकरारेभजन ऐकारेकीर्तन नकाहोऊंरेराकेस सुद्धठेवामन आतासरलाअभंग चाललीपावली ‘जेजेइठ्ठलरखूमाई ईठाईमाऊली’ शेतामंधीगयेघाम हाडंमोडीसनी आतांघ्यारेहरीनाम टायापीटीसनी

देव्हारा

हृदयात आहे माझ्या 
एक एकांत कोपरा 
चिमुकला तुझ्यासाठी 
तेथे चंदेरी देव्हारा 

संसाराच्या कोलाहली 
नाही संवाद आपुला 
नाही प्रेमभाव कधी 
अक्षरांत आकारला 

स्पर्शातून स्मितातून 
अपेक्षा न ओसंडल्या 
फुलल्या न नेत्रांतून 
भावपुष्पाच्या पाकळ्या 

नदीकिनारी न कधी 
केले कूजन मंजुळ 
चांदण्यात रचिले ना 
कधी स्वप्नांचे देऊळ 

व्यक्ततेच्या पलीकडे 
माझे भावनापुजन 
पार्थिवाच्या पलीकडे 
तुझे - माझे मीलन !

: देव्हारा 
: मराठी माती 
: कुसुमाग्रज