Skip to main content

Posts

Showing posts from January, 2016

आनंदनिधान

दिसा देई कोवळीक 
देई शोभाही अंधारा 
गोरजाच्या झळाळीत 
विलसतो सायंतारा 

जात्या दिवाकरा काय 
देव आशीर्वाद देतो 
येत्या यामिनीच्या भाळी 
शुभ अक्षत लावितो ?

उरी माजता तुफान 
असा तसा गाजे वारा :
त्याच्या दर्शनाने मात्र 
होतो मंजुळ लेहरा 

जीव होतो लाही लाही 
चढे विखार तापांचा 
त्याच्या दर्शनाने कसा 
होतो पिसारा चंद्राचा 

माझे आनंदनिधान 
तोच एक सायंतारा 
माझ्या जीवनाचा तोच 
पूर्णविराम हासरा 

जिथे असावे तिथून 
त्याला सन्मुख रहावे 
डोळा भरून पाहता 
विश्व नाहीसेच व्हावे 

: आनंदनिधान 
: बाहुल्या 
: इंदिरा संत 

happy republic day 2016

औक्षण

नाही मुठींमध्ये द्रव्य 
नाही शिरेमध्ये रक्त 
काय करावे कळेना 
नाही कष्टाचे सामर्थ्य 

जीव ओवाळला तरी 
जीव किती हा लहान 
तुझ्या शौर्यगाथेपुढे 
त्याची केवढीशी शान 

वर घोंघावे बंबारा 
पुढे कल्लोळ धुराचे 
धडाडत्या तोफांतून 
तुझे पाऊल जिद्दीचे 

तुझी विजयाची दौड 
डोळे भरून पहावी 
डोळ्यांतील आसवांनी 
ज्योत ज्योत पाजळावी 

अशा असंख्य ज्योतींची 
तुझ्यामागून राखण 
दीनदुबळ्याचे असे 
तुला एकच औक्षण 

: औक्षण 
: बाहुल्या 
: इंदिरा संत

देणे

निरवाया सारे काही 
आज हिशेब मांडला 
देणे द्यायचे पाहून 
जीव मुठीत कोंडला 

देणे आहे एक शब्द 
कसा यावा ओठांतून ?
मौन भरता अथांग 
उरले न शब्दपण 

देणे आहे एक अश्रू 
ओला होईना लोचन 
मुठ वाळूचे काळीज 
कसे काढावे पिळून ?

नाही जावयाचे सत्त्व 
नाही रहावयाचे ऋण 
घेऊनिया जन्म जन्म 
देणे एवढे फेडीन 

: देणे 
: बाहुल्या 
: इंदिरा संत

उतार

व्यथासोसायचीतुझी कितीवेगळीगंरीत जिथेरुजलिसेव्यथा वेलहोऊनीयायेत
वेळआलीसेबहरा पानोपानीफूलफूल : तुझ्याभरल्याजीवनी रंगगंधांचादर्वळ
जिथेटाकलेपाऊल तिथेसांडतातफ़ुले ओठांडोळ्यांतूनतुझ्या घोसफुलांचाउमले
अशीआरासफुलांची मधेधुंदतूनागीण : एकाविषालाउतार दुजेजहरपिऊन
: उतार : बाहुल्या : इंदिरासंत

हाकेवरी आहे गाव

हाकेवरीआहेगाव याचआशेनेचालले गेलेदिवसमहिने : वाटेयुगचसंपले
दूरदूरतेवणारा दिवाकसातोदिसेना डोंगराच्यापायथ्याशी रेघधुराचीवोळेना
ऐकूयॆइनापावरी आणिघुंगुरांचानाद राऊळीच्याघंटेचाही उमटेनापडसाद
कुठेअसेलतेगाव जिथेआहेपोचायाचे कुठेअसेलतेघर जिथेआहेथांबायाचे ?
कुठेअसेलतोस्वामी त्याहीवास्तूचामहान ज्याच्यापायापाशीआहे टाकावयाचेआहेतनमन
: हाकेवरीआहेगाव : बाहुल्या : इंदिरासंत

तुझ्याभोवती

असेचफसलेहोतेहेतू तुझ्याभोवतीभोवळतांना , असेचफसलेहोतेडोळे तुलाचसगळीसाठवताना
फसलीनाहीतुझीपापणी ढाळीतअसतांतमीचांदणी फसलेनाहीअधरजराही घालीतअसतांफुंकरमौनी
गाठितहोतीसक्षितीजमुक्याने मुकेचहोतेंक्षितीजपरंतु तुझ्याभोवतीभोवळताना म्हणूनफसलेहोतेहेतू
: तुझ्याभोवती : जोगवा : आरतीप्रभू