Saturday, May 9, 2015

माझ्या मायेचा आठव

माझ्या मायेचा आठव,जसा पौषातला वारा
जवा थकून बसेल बाप्पा दे रे तिला थारा
फिरू फिरू आवरे ती उभ्या जल्माचा फुफाटा
तरी उरामंदी का रं तिच्या बाभळीचा काटा
बाई होती ती म्हणून मही आय माय झाली
ओटी पोटी आवळून भर पावसात व्याली
बाप बाईचा जलम उभ्या धस्कटाच रानं
इख पचवील जरी उरी अम्रुताच थान....

1 comment: