Friday, May 8, 2015

सांत्वन

अंतर होते तसे परंतु
     असेही आता पडावयाचे
माहित होते मनामनाला
     अखेर हेही घडावयाचे .
खंत कशाला श्रावणतेचा
     खजिना फुटला गगनावरती
इंद्रजाल हे काय कुडाच्या
     या भिंतीवर चढावयाचे ?
नियती देते दान असे कि
     खिशांमध्ये जे मावत नाही
खिशे असे कंगाल मिळाले
     त्यासाठी का कढावयाचे ?
अपुल्या भिंती खिसेही अपूले
    अभेद्य त्यांची हुकुमत असते
म्हणून का तिमिराचे घुंगट
     या घटकेवर विनावयाचे ?

: सांत्वन
: वादळवेल
: कुसुमाग्रज2 comments:

  1. jabardast collection!!!

    Mindsriot.blogspot.com

    ReplyDelete
  2. me pan blog lihito pan maze contents khup random asatat, i was quite impressed by seeing your blog...thanks

    ReplyDelete