Tuesday, May 5, 2015

मोगरा

असा मोगरा समोर फुलता
दुरपणाचा दत्तक बाणा
          कसा रहावा
मलयगंध देहात दाटता
गतागताचा शीर्ण नकाशा
          कुणी पहावा
इंद्रजाल हे असे उमलता
स्वप्न म्हणे ही जमीन माझी
          घटकेकरिता
सागर विसरुनी , धवल फुलांनो
तुमच्यासाठी उभी राहिली
          जीवनसरिता .

: मोगरा
: वादळवेल
: कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment