हजार हास्ये
स्मिते असंख्य
या वाटेवर
मला भेटती
दोन घडींच्या
गर्द तृणांतून
फुलांप्रमाणे
अवचित उठती
सांजकाळच्या
धुसरतेतून
चंद्र्करांचे
स्वरूप घेती
जरठ तरूंच्या
फांद्यांवरुनी
भुताप्रमाणे
घसरत येती
.
आणिक माझा
मार्ग अडवूनी
उदासतेने
मजला म्हणती
शरीर कोठे
आम्ही कोठे
हीच काय रे
आमुची नियती !
: त्या मार्गावर
: वादळवेल
: कुसुमाग्रज
Comments
Post a Comment