Sunday, May 3, 2015

कारण

अखेर जेव्हां
बाग पहाटे
ऐकू आली -
नेत्रावरती
नव्हते माझ्या
किरण
दिव्यांचे -
होते केवळ
विस्कटलेल्या
वाक्यामागून -
अमृतकलशा
परी सांडल्या
स्मरण
स्मिताचे

: कारण
: वादळवेल
: कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment