Wednesday, May 20, 2015

पराग

हें सगळे ओलांडून ओलांडून यावें.
कुठे गुंतावे. कुठे हरवावें.
लाटांच्या पोटांतून-ओठांतून हलकेच
किनाऱ्याशी यावें .
हलके फूल व्हावें.
पाकळ्या गळून नुसते पराग उरावे.

परागही गळून नुसता गंध उरावा.


No comments:

Post a Comment