Tuesday, May 12, 2015

केवढी ताकद हवी

केवढी ताकद हवी,
पाउल पुढे उचलून टाकण्यासाठी....
समोर जाण्यासाठी...
केवढी शक्ति हवी,
उफाळुन आलेले काळजात कोंदण्यासाठी...
ओठ हसरे ठेवण्यासाठी....
केवढा आवेग हवा,
फुलोरी फांदी वार्यावर झूलन्यासाठी...
मॉकळेढकले वागण्यासाठी...
पण जीवन किती समजूतदार असते,
वार्याची झुळुक आल्यगेल्यासारखरे सगळे सहज सहज होते
मन मात्र गारव्याने भरून येते.
: इंदिरा संत


No comments:

Post a Comment