Saturday, May 2, 2015

सांस्कृतिक यमक

आकाशात
तारा
गव्हाणीत
चारा
वेश्येच्या
वेणीत
मोत्यांचा
तुरा

आमुच्या पोटात
मांसल बीभत्स
काळीज चिरणारा
भुकेचा
चुरा

: सांस्कृतिक यमक
: वादळवेल
: कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment