Wednesday, April 15, 2015

लक्ष लक्ष

लक्ष लक्ष तू
अन लक्ष लक्ष वेळ
मी एक अनंताचा चुकला

लक्ष लक्ष वेळ तुला
रिकामीच पाठवावे ;
लक्ष लक्ष वेळ तुला
साठवावे आठवावे

मिठी पडताच तुझी
तुझ्याहून दूर व्हावे
कुण्या बाहुलीचे दुःख
तुझ्या डोळ्यात रचावे

पहाटेच्या कळ्यापाशी
थोडे मागावे इमान
तुला सांगावे तुलाही
माझ्या मनाचे प्रमाण

लक्ष लक्ष तू
अन लक्ष लक्ष वेळ
मी एक अनंताचे चुकले पाऊल 

: लक्ष लक्ष
: जोगवा
: आरती प्रभू


No comments:

Post a Comment