Wednesday, April 15, 2015

ढग लागून जिव्हारी

आली सर गेली सर
रिकामीच राही चोच
गढूळंच कुठे जरा
आडोशाला डबकेच

श्रांत झाला नाही संथ ,
ऋण नाहीच फिटले
माळावर जरा कुठे
त्रुण नाहीच वाकले

दाटलेली अजूनही
काळी गळ्यात ओकारी
कुणावर फिदा झाला
ढग लागून जिव्हारी ?

: ढग लागून जिव्हारी
: जोगवा

: आरती प्रभू

No comments:

Post a Comment