Friday, April 24, 2015

जगायास तेव्हा खरा अर्थ होता

जगायास तेव्हा खरा अर्थ होता,
निरर्थासही अर्थ भेटायचे,
जगायास तेव्हा खरा अर्थ होता,
निरर्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा,
अन मनासारखे शब्दही यायचे...
नदीसागराचे किनारे कधीही
मुक्याने कितीवेळ बोलायचे,
नदीसागराचे किनारे कधीही
मुक्याने कितीवेळ बोलायचे,
निघुनी घरी शेवटी जात असता,
वळूनी कितीदा तरी पाह्यचे....
उदासी जराशी गुलाबीच होती,
गुलाबातही दुखः दाटायचे
उदासी जराशी गुलाबीच होती,
गुलाबातही दुखः दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता,
नभाला किती खिन्न वाटायचे....
असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी
जुने पावसाळे नवे व्हायचे
असेही दिवस कि उन्हाच्या झळांनी
जुने पावसाळे नवे व्हायचे
ऋतूंना ऋतूंनी जरा भागले कि
नव्याने जुने झाड उगवायचे
ऋतूंना ऋतूंनी जरा भागले कि
नव्याने जुने झाड उगवायचे
मनाचा किती खोल काळोख होता,
किती काजवे त्यात चमकायचे
मनाचा किती खोल काळोख होता,
किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही
मनाला किती शुभ्र वाटायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही
मनाला किती शुभ्र वाटायचे
आता सांजवेळी निघोनी घरातून
दिशाहीन होऊन चालायचे
आता पाऊलेही दुखू लागली कि,
जरा मीच त्यांना उरी घ्यायचे
जगायास तेव्हा खरा अर्थ होता,
निरर्थासही अर्थ भेटायचे......
: सौमित्र


1 comment:

  1. किशोर कदमांच्या कविता म्हणजे खरच जबरदस्तच...
    गारवा आणि सांजगारवा… drives crazy always…
    really thanks you for this

    ReplyDelete