Wednesday, March 25, 2015

एकपण

माझ्या गात्रात फुटले
उन्ह - कळ्यांचे तरंग
चार डोळ्यांनी झालिले
तुझे माझे सारे अंग !

एका शब्दाने नभाला
नको करूस पोकळी
झाड तोडून घावांनी
केली सावली मोकळी

: एकपण
: सांजभयाच्या साजणी

: ग्रेस

No comments:

Post a Comment