Friday, February 27, 2015

भावगीत

सांध्य सावल्यांत एक
भावगीत हरवले
शोधतो घनाघनात
सूर मी तयातले

त्या सुरेल संगतीत
पंख लाभले उपेस
जाहले मलूल दाह
जाळत्या उन्हातले

सांत्वने नि रक्षणेहि
उमलली तयात त्या
तेच गीत जागवीत
दीप अंतरातले

या रितेपणात रात
ये घनांध भोवती
काळजात थेंब थेंब
गोठती तमातले


: भावगीत

No comments:

Post a Comment