Friday, February 27, 2015

अजूनही

निळ्या जांभळ्या नदीला
आंबेवनाची सावली
भेट पहिलीवहिली
अकल्पित .

भेट दूरस्थपणाची
गर्भरेशमी क्षणांची
सौदामिनीच्या बाणांची
देवघेव

गुलबक्षीच्या फुलांनी
गजबजले कुंपण
वेचू लागला श्रावण
मोरपिसे .

ओल्या आभाळाच्या खाली
इंद्र्चापाचे तुकडे
तुझा करपाश पडे
जीवनास .

कधी रेताडीचे रस्ते
माझ्या जीवनाचे गीत
तुझ्या सारंगीचे तात
साथ झाली .

बर्फवाट शिशिराची
आता पुढलीया देशी
तुझ्या मिठीची असोशी
अजूनही

: अजूनही
: छंदोमयी
: कुसुमाग्रज

भावगीत

सांध्य सावल्यांत एक
भावगीत हरवले
शोधतो घनाघनात
सूर मी तयातले

त्या सुरेल संगतीत
पंख लाभले उपेस
जाहले मलूल दाह
जाळत्या उन्हातले

सांत्वने नि रक्षणेहि
उमलली तयात त्या
तेच गीत जागवीत
दीप अंतरातले

या रितेपणात रात
ये घनांध भोवती
काळजात थेंब थेंब
गोठती तमातले


: भावगीत

Thursday, February 26, 2015

I know now you're my only hope

There's a song that's inside of my soul
It's the one that I've tried to write over and over again
I'm awake in the infinite cold
But You sing to me over and over and over again

So I lay my head back down
And I lift my hands
and pray to be only Yours
I pray to be only Yours
I know now you're my only hope

Sing to me the song of the stars
Of Your galaxy dancing and laughing
and laughing again
When it feels like my dreams are so far
Sing to me of the plans that You have for me over again

So I lay my head back down
And I lift my hands and pray
To be only yours
I pray to be only yours
I know now you're my only hope

I give You my destiny
I'm giving You all of me
I want Your symphony
Singing in all that I am
At the top of my lungs I'm giving it back

So I lay my head back down
And I lift my hands and pray
To be only yours
I pray to be only yours
I pray to be only yours
I know now you're my only hope


वादळ

अशा वादळ वेळेला
माझ्या राजस पाखरा
राहा राखून आसरा
धीरतेचा

वर फुटले आभाळ
लोटे घनावरी घन
त्यांचे घायाळ गर्जन
निनादते

घुमे बिजली पिसाट
पडे शूलापरी धार
फांदीफांदीला अंधार
लोंबलेला

पिसांपरांच्या  महाली
तुझे जोपासले जिणे
पुष्प परागाचे गाणे
पंखांवर

काळ पक्षांच्या वैराचा
नभी जाऊदे वाहून
खाली क्षितिजाच्या ऊन
थांबलेले

: वादळ
: छंदोमयी

: कुसुमाग्रज

Friday, February 13, 2015

ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते

येताना कधि कळ्या आणिते

अन् जाताना फुले मागते.


येणेजाणे, देणेघेणे

असते गाणे जे न कधी ती म्हणते.


येताना कधि अशी लाजते

तर जाताना ती लाजविते

कळते काही उगीच तेही,

नकळत पाही काहीबाही,

अर्थावाचुन उगीच 'नाही', 'नाही' म्हणते.

येतानाची कसली रीत

गुणगुणते ती संध्यागीत

जाताना कधि फिरून येत,

जाण्यासाठिच दुरुन येत,


विचित्र येते, विरून जाते जी सलते.

Tuesday, February 3, 2015

इस तौबा पर है नाज़ तुझे ज़ाहिद इस क़दर

इस तौबा पर है नाज़ तुझे ज़ाहिद इस क़दर

जो टूट कर शरीक हो मेरे गुनाह में