Wednesday, November 19, 2014

"हयात (ज़िन्दगी) फूंक दे, हवास (रूह) फूंक दे

"हयात (ज़िन्दगी) फूंक दे, हवास (रूह) फूंक दे

सांस से सिला हुआ लिबास (शरीर) फूंक दे.. "

Thursday, November 13, 2014

तुला कुठलं फुल आवडेल ?


तुला कुठलं फुल आवडेल ?
तो क्षणात उत्तरला ….
मनात जपायला चाफा आवडेल
आणि ओंजळीत धरायला मोगरा

वहीत ठेवायला बकुळ आवडेल
आणि धुंद व्हायला केवडा

बोलायला अबोली आवडेल
आणि फुलायला सदाफुली

पण प्राजक्त मात्र आवडेल तो,
देवाच्या पायांशी ठेवायला , आशीर्वादासाठी

यावर ती थोडीशी नाराज झाली ,
कारण तीच नावं रातराणी होत

त्यांने हे ओळखलंतो पुढे आला आणि हलकेच
हसत म्हणाला ,
हे सगळं नंतर आवडेल
रातराणी खिडकीशी दरवळल्या नंतर …!!!

तेव्हांपासून ती अखंड दरवळते आहे
त्याच्या मनातअंगणात ……