Friday, June 20, 2014

सावध

आज अखंड मी जागी
रात्र धरून डोळ्यात …

आज अखंड सावध :

कुठे पाखरू उडेल, 
झेप तिरप्या पंखांची :
कुठे रात्र डहुळेल 

आज अखंड मी जागी :
कुठे काजवा झुकेल ,
ओझरता झोत त्याचा:
कुठे रात्र उजळेल ;

उभा रक्ताचा  पहारा :
कुठे फुटेल पाहत,
कुठे दवाने भिजेल 
पापणीचा कृष्णकाठ 

आज अखंड मी जागी 
रात्र धरून डोळ्यात … 

: सावध 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment