Saturday, June 21, 2014

स्वर वेडी

किलबिलताना रानपाखरे 
स्वरबिंदूची सतारशिंपण 
झेलून घेते अंगागावर 
मी तरफांच्या तारा होऊन ,

गाजगाजता प्रचंड पिंपळ 
काठाशी मी वाट पाहते :
स्वरमेळाचीलाट अनावर 
येता तिजवर झोकून देते 

धुसर वेळी कधी लागतो 
सूर जिव्हाळी पैलतीरावर :
क्षणात होऊन विश्ववेगळी 
पाय टाकते मी डोहावर !

: स्वर वेडी 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment