Friday, June 20, 2014

साज

त्या दिवशीचा साज अजूनही 
तसाच आहे अंगावरती …. 

जळलहरींची सपात शामल 
जुई -जाईची किनार जीवर ,
रेशीमपिवळे वस्त्र उन्हाचे 
किरण जरीचे भरपदरावर ;

सोनमखमली  कातीव चोळी ,
मोरपिसांची कुसर भुजांवर ,
बावरलेली काजळरेखा ,
सावरलेला बकुळवळेसर 

त्या दिवशीचा साज अजूनही 
तसाच आहे अंगावरती …. 

: साज 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 


No comments:

Post a Comment