Wednesday, June 25, 2014

आसवे

मैत्रीचे नाते होते अपुले जेंव्हा
लागून ओढणी सहवासाची तेंव्हा
मनी दाटून आल्या गोड भावना नाना
अन एकांती मी ढाळीयले अश्रुना .
मग जलस्नात त्या फुलांसारखे झाले
मन माझे ताजे प्रसन्नतेने भरले .

मी विवाहमाला तुझ्या घातली कंठी
मजकडे पाहसी स्वर्ग आणुनी नेत्री
त्या गभीरमंगल समयी डोळ्यांमधुनी
निखळली आसवे : भरली मांगल्यानी
घट सौख्याशेचा हृदयी आला भरून :
जणू त्यातील आले उसळुनी बिंदू दोन .

अन तेव्हापासून कितीकदा नयनात
साठली आसवे ,ओघळली जोमांत .
जे आले अश्रू उसळून आनंदाने
जाहली तयांची फुले तुझ्या स्पर्शाने ;
त्या अश्रुफुलांचा गंध जई दरवळला
संसार भासला मधुसुमनांचा झॆला !

मन गेले केव्हा दुः खाने व्याकळून ;
असहायपनाने  भरुनी आले नयन
तव नजर बोलतां परी शांत गंभीर
हो इंद्रधनूपरी आर्त ,पालटे नूर .

जी तुझ्याचसाठी आली अन ओघळली ,
स्पर्शाने तुझिया फुलली,खुलली,हसली ,
ती आता आसवे कुठे जाहली गुप्त
जी ढाळून व्हावे दुग्ध चित्त हे शांत !

: आसवे
: शेला
: इंदिरा संतNo comments:

Post a Comment