Friday, June 20, 2014

हाक

गेले विसरून डोळे ,
विसरून गेले कान
केव्हाच मी केले त्यांना 
कर्मकांडाच्या स्वाधीन ;

आज क्षितिजापल्याड 
कोण उभे ते दिसेना ;
हाक ऐकली तरीही 
कोणाची ते आकळेना ;

ओठावरी आले विष,
आल्या वेदना डोळ्यात 
हाक आभाळा एवढि 
गोठवीत हुंदक्यात . 

: हाक 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment