Tuesday, June 17, 2014

अस्वस्थ

किती कडाडली  वीज ,
किती घोंगावला वारा ,
किती झपाटले मेघ ,
किती कोसळल्या धारा ;

झाकोळलेल्या फांद्यातून 
फिक्या उन्हाचे ओहोळ ,
आता स्वस्थ भुरी हवा 
आणि अस्वस्थशी वेळ ;

ओल्या गर्द मातीवर 
जर्द पाकळ्यांचे मौन ,
पानापानाच्या टोकाशी 
अस्वस्थसा मुका कण . 

:अस्वस्थ 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment