Tuesday, June 17, 2014

डोळ्यापरिस लहान

डोळ्यापरिस  लहान 
आज वाटते आकाश ;
रात्र दिवसाचा काळ 
झाला निमिष निमिष !

मन सुटून चालले 
शरीराच्या मिठीतून ;
विश्वापल्याडचे काही 
काय गेले त्या स्पर्शून ?

: डोळ्यापरिस  लहान 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment