Friday, June 20, 2014

अवंढा

गिळला एक अवंढा 
आणिक कथिले सारे ,
गिळला एक अवंढा 
आणि समजले सारे,
गिळला एक अवंढा 
आणिक गीळले सारे . 

अता न उरले काही 
जे आहे सांगायचे ,
अता न उरले काही 
जे आहे समजायाचे ,
अता न उरले काही 
जे आहे सोसायाचे . 

ते दिवस: बहर जाईचे ,
हे: आभाळ भुंडे बघणे ,
त्या आर्त चांदण्या रात्री ,
हि काळझोप नच ढळणे ;
ते होते माझे जीवन ,
हि आता नुसती श्वसने !

: अवंढा 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment