Monday, June 16, 2014

मुकी जास्वंद

म्हणावे तू बोलू नको 
आणि मी हि व्हावे मूक ;
म्हणावे तू येऊ नको 
आणि मीही व्हावे रुख . 

आज एका शब्दासाठी 
तुझे आभाळाचे कान 
आणि माझ्या स्वागताला 
उभी बाहूंची  कमान !

_कळायची आता तुला 
जास्वंदाची शापकथा ,
पाय जिचे पाळेमुळे 
मुकी पुष्पे लक्ष गाथा 

: मुकी जास्वंद 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment