Skip to main content

Posts

Showing posts from June, 2014

सांग तू आहेस का ?

त्याफुलांच्यागंधकोषी, सांगतूआहेसका ? त्याप्रकाशीतारकांच्या, ओतिसीतूतेजका ? त्यानभांच्यानीलरंगीहोऊनियागीतका ? गातवायूच्यास्वरांने, सांगतूआहेसका ?
मानवाच्याअंतरीचाप्राणतूआहेसका ? वादळाच्यासागराचेघोरतेतूरुप

आसवे

मैत्रीचेनातेहोतेअपुलेजेंव्हा लागूनओढणीसहवासाचीतेंव्हा मनीदाटूनआल्यागोडभावनानाना अनएकांतीमीढाळीयलेअश्रुना . मगजलस्नातत्याफुलांसारखेझाले मनमाझेताजेप्रसन्नतेनेभरले .
मीविवाहमालातुझ्याघातलीकंठी मजकडेपाहसीस्वर्गआणुनीनेत्री त्यागभीरमंगलसमयीडोळ्यांमधुनी निखळलीआसवे : भरलीमांगल्यानी घटसौख्याशेचाहृदयीआलाभरून : जणूत्यातीलआलेउसळुनीबिंदूदोन .
अनतेव्हापासूनकितीकदानयनात साठलीआसवे ,ओघळलीजोमांत . जेआलेअश्रूउसळूनआनंदाने जाहलीतयांचीफुलेतुझ्यास्पर्शाने ; त्याअश्रुफुलांचागंधजईदरवळला संसारभासलामधुसुमनांचाझॆला !
मनगेलेकेव्हादुःखानेव्याकळून ; असहायपनानेभरुनीआलेनयन तवनजरबोलतांपरीशांतगंभीर होइंद्रधनूपरीआर्त ,पालटेनूर .
जीतुझ्याचसाठीआलीअनओघळली , स्पर्शानेतुझियाफुलली,खुलली,हसली , तीआताआसवेकुठेजाहलीगुप्त जीढाळूनव्हावेदुग्ध

स्वर वेडी

किलबिलताना रानपाखरे 
स्वरबिंदूची सतारशिंपण 
झेलून घेते अंगागावर 
मी तरफांच्या तारा होऊन ,

गाजगाजता प्रचंड पिंपळ 
काठाशी मी वाट पाहते :
स्वरमेळाचीलाट अनावर 
येता तिजवर झोकून देते 

धुसर वेळी कधी लागतो 
सूर जिव्हाळी पैलतीरावर :
क्षणात होऊन विश्ववेगळी 
पाय टाकते मी डोहावर !

: स्वर वेडी 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

साज

त्या दिवशीचा साज अजूनही 
तसाच आहे अंगावरती …. 

जळलहरींची सपात शामल 
जुई -जाईची किनार जीवर ,
रेशीमपिवळे वस्त्र उन्हाचे 
किरण जरीचे भरपदरावर ;

सोनमखमली  कातीव चोळी ,
मोरपिसांची कुसर भुजांवर ,
बावरलेली काजळरेखा ,
सावरलेला बकुळवळेसर 

त्या दिवशीचा साज अजूनही 
तसाच आहे अंगावरती …. 

: साज 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 


सावध

आज अखंड मी जागी
रात्र धरून डोळ्यात …

आज अखंड सावध :
कुठे पाखरू उडेल, 
झेप तिरप्या पंखांची :
कुठे रात्र डहुळेल 

आज अखंड मी जागी :
कुठे काजवा झुकेल ,
ओझरता झोत त्याचा:
कुठे रात्र उजळेल ;

उभा रक्ताचा  पहारा :
कुठे फुटेल पाहत,
कुठे दवाने भिजेल 
पापणीचा कृष्णकाठ 

आज अखंड मी जागी 
रात्र धरून डोळ्यात … 

: सावध 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

हाक

गेले विसरून डोळे ,
विसरून गेले कान
केव्हाच मी केले त्यांना 
कर्मकांडाच्या स्वाधीन ;

आज क्षितिजापल्याड 
कोण उभे ते दिसेना ;
हाक ऐकली तरीही 
कोणाची ते आकळेना ;

ओठावरी आले विष,
आल्या वेदना डोळ्यात 
हाक आभाळा एवढि 
गोठवीत हुंदक्यात . 

: हाक 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

अवंढा

गिळला एक अवंढा 
आणिक कथिले सारे ,
गिळला एक अवंढा 
आणि समजले सारे,
गिळला एक अवंढा 
आणिक गीळले सारे . 

अता न उरले काही 
जे आहे सांगायचे ,
अता न उरले काही 
जे आहे समजायाचे ,
अता न उरले काही 
जे आहे सोसायाचे . 

ते दिवस: बहर जाईचे ,
हे: आभाळ भुंडे बघणे ,
त्या आर्त चांदण्या रात्री ,
हि काळझोप नच ढळणे ;
ते होते माझे जीवन ,
हि आता नुसती श्वसने !

: अवंढा 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

अस्वस्थ

किती कडाडली  वीज ,
किती घोंगावला वारा ,
किती झपाटले मेघ ,
किती कोसळल्या धारा ;

झाकोळलेल्या फांद्यातून 
फिक्या उन्हाचे ओहोळ ,
आता स्वस्थ भुरी हवा 
आणि अस्वस्थशी वेळ ;

ओल्या गर्द मातीवर 
जर्द पाकळ्यांचे मौन ,
पानापानाच्या टोकाशी 
अस्वस्थसा मुका कण . 

:अस्वस्थ 
: रंगबावरी 
: इंदिरा संत

डोळ्यापरिस लहान

डोळ्यापरिस  लहान 
आज वाटते आकाश ;
रात्र दिवसाचा काळ 
झाला निमिष निमिष !

मन सुटून चालले 
शरीराच्या मिठीतून ;
विश्वापल्याडचे काही 
काय गेले त्या स्पर्शून ?

: डोळ्यापरिस  लहान 
: रंगबावरी 
: इंदिरा संत

फुलवेडी

नको टाकुस उसासा 
अशी दारात राहून:
वळचणीच्या अबोलीचा 
रंग जाईल उडून ;

अशा शून्य नजरेने 
नको राहू खिडकीशी :
वेध घेऊन डोळ्यांचा 
जाई होईल ग बाशी 

नको घालू येरझारा ,
नको थांबू इथे तिथे 
तुझ्या पदरझळीने 
ताजी पाकळी गळते ;

हवा फुलांचा शेजार 
बाई , हासत रहावे;
काळजाच्या कुपीमध्ये 
हवाबंद दुःख व्हावे 

: फुलवेडी 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

शीण

किती  चालावे चालावे 
कधी कधी येतो शीण :
वाटे घ्यावासा विसावा 
कुठे कुणाशी थांबून …

असे वाटता काहीसे 
काही वाटेनासे होते;
भुते फुटती पायांना 
वाट भिऊन पळते …

: शीण 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

लिहून थोडे

लिहून थोडे लहान व्हावे 
पघळावे  अन… 
जीवकळेला . 
जीभ माळवून घ्यावी कंठी ;
      अथांग व्हावे 
श्वासाश्वासातून तळाला . 

: लिहून थोडे 
: जोगवा 
: आरती प्रभू