Thursday, June 12, 2014

शीण

किती  चालावे चालावे 
कधी कधी येतो शीण :
वाटे घ्यावासा विसावा 
कुठे कुणाशी थांबून …

असे वाटता काहीसे 

काही वाटेनासे होते;
 भुते फुटती पायांना 
वाट भिऊन पळते …

: शीण 

: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment