Monday, April 28, 2014

दूर दूर कोठे तरी


दूर दूर कोठे तरी 
जड पाणी निश्छ्ल 
आणि इथे क्षण एक 
होतो निःश्वास व्याकुळ 

दूर दूर घातलेली 
शब्द्ब्रम्हाला शपथ ;
इथे मुकीच आसवे 
मिटलेल्या पापणीत 

दूर दूर अशी वाटे 
मुक्या व्यथेची चाहूल 
आणि इथे  घोंगावते 
उभ्या रात्रीचे वादळ 

दूर दूर असे काही 
दूर असेच रहाते :
चकव्याची वाट इथे 
पाय मागे मागे घेते 

: दूर दूर कोठे तरी 
: रंगबावरी 
: इंदिरा संत 

No comments:

Post a Comment