Monday, March 31, 2014

मोर

चंद्र कलंडला तरी
रात्र वेल्हालत आहे 
फांद्यातून जलातून 
स्वप्न निथळत आहे 

मैफलीच्या अखेरीला 

उभी कोपरयात वीणा 
तारांतून तरी मंद 
गीत पाझरत आहे 

सोस जीवना , हा किती 

अस्तित्वाच्या सीमेवर 
पंखहीन लालसेचा 
मोर आरवत आहे. 

:मोर

: छंदोमयी 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment