Tuesday, April 23, 2013

अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ ......


मी नखलत नाही शिरा कोवळ्या ओल्या 

दुमडून कडांना दुखवत नाही देठ ..... 
मी फक्त ठेवते उजेड हिरवा आत 
अन प्रेमासाठी मिटून घेते ओठ ...... 

: अरुणा ढेरे 

Thursday, April 4, 2013

जेव्हा मी ....जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन

तेव्हा एक कर
तू निःशंकपणे डोळे पूस.
ठीकच आहे, चार दिवस-
उर धपापेल, जीव गुदमरेल.
उतू जणारे हुंदके आवर,
कढ आवर.
उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस
खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक घर कर
मला स्मरून कर,
हवे तर मला विस्मरून कर.

- नारायण सुर्वे

Wednesday, April 3, 2013

एक हात तुझा एक हात माझाएक हात तुझा एक हात माझा 
जसा शब्द खुजा शब्दापाशी 

एका हृदयाला एकच क्षितीज 
आकाशाचे बीज तुझ्या पोटी 

एका कुशीसाठी एकाचे निजणे 
बाकीची सरणे स्मशानात 

: ग्रेस