Wednesday, March 27, 2013

किती सोसाव्या साजणाकिती सोसाव्या साजणा 
तुझ्या ओळखीच्या कळा
तुझ्या सहज स्वप्नात 
माझ्या वेदनेच्या वेळात 

वाट शपथांची वळे
दाट विश्वासाचे रान 
किती विस्ताराव्या हाका 
तुझे हलेचना पान 

कशी अक्षरे भोगावी 
तुझ्या खेळी जाती बळी 
रक्त चांदण्यात न्हाती 
गर्द कवितांची तळी....

: अरुणा ढेरे 
: यक्षरात्र  


No comments:

Post a Comment