Thursday, January 24, 2013

तुझ्या पथावर

तुझ्या पथावर  तुझ्या पदांच्या 
पाउलखुणांच्या शेजारी मम 
पाउलखुणा या उमटत जाती 
खरेच का हे?

मातीमधल्या मुसाफिरीतून 
हात तुझा तो ईश्वरतेचा 
चुरतो माझ्या मलिन हाती 
खरेच का हे?

खरेच का आहे - बरेच का हे -
दोन जगांचे तोडूनी कुंपण 
गंधक -तेजाबसम आपण 
मिळू पाहावे 

आणि भयानक दहन टाळण्या 
जवळपणातही दूर राहुनी
स्पोटाच्या या सरहद्दीवर 
सदा राहावे ?

: तुझ्या पथावर 
: वादळवेल 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment