Monday, January 21, 2013

सये आत्ता सांग

येण्याआधी वाट ,आल्यावर सर 
आणि गेल्यावर , रिक्त मेघ 

इतके लाडके , असू नये कोणी 
डोळ्यातून पाणी , येते मग 

रातराणी बोल , 'परत कधी' चे 
उत्तर मिठीचे , संपू नये 

सये आत्ता सांग , सांग तुझे घर 
आहे वाटेवर, माझ्याच न ???....

: संदीप खरे 

No comments:

Post a Comment