Sunday, January 13, 2013

हे गगना

हे गगना तू माझ्या गावी 
आणि तिच्याही गावी 
तुला उदारा, पहिल्या पासून 
सर्व कहाणी ठावी 

अशी दूरता अपार घडता 
एक तुझीच निळाई 
अंतरातही एकपणाचे 
सांत्वन जगवित राही 

घन केसांतुनी तिच्या अनंता 
फिरवीत वत्सल हात 
सांग तिला कि दूर तिथेही 
जमू लागली रात .....

: हे गगना 
: छंदोमयी 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment