Friday, January 4, 2013

मिठी


अश्या उन्हाला 
बांध नसावा ...
उडण्यासाठी 
गवताचे आकाश असावे 
तुडुंब हिरवे .....

या बकुळीला 
मखर नसावे ...
फुलण्यासाठी 
पानांच्या पापण्यांत मिटल्या 
शहारता एकांत असावा 
अबोल बुजरा ...

अशा तुला अन्
भान नसावे ...
बुडण्यासाठी 
माझी गहिरी मिठी असावी 
उत्कट दुखरी ......

: उत्सव : मंगेश पाडगावकार 

No comments:

Post a Comment