Thursday, June 14, 2012

ओळखीची सर


पहाटेला आलेली ही ओळखीची सर 
ओले ओले करणारी फुलांत केसर......

किती दूर गेले फूल :
आली डोळ्यावर भूल,
एकाएकी पाकळ्यांना पडला विसर...

पहातो मी पुन्हा पुन्हा 
कुठे दिसतील का खुणा :
गवतात मावळली फुलांची कुसर.....

जीव लावियेला असा 
घेता परत ये कसा?????
पापण्यात जग झाले धुक्याने धूसर.....

: ओळखीची सर 
:भटके पक्षी 
: मंगेश पाडगावकर .

No comments:

Post a Comment