Tuesday, March 27, 2012

फूल...

फूल...
हिममंद कनांचा खांब 
जसे प्रतिबिम्ब 
जडावे नयनी,
मेघांवरचा रंग मालवून 
दूर निघाले कोणी...
दूर निघाले कोणी, अवघे---
---दुःखच नेत्री जडले
अंबर वरती विरले
सांज-विसरल्या रात्रिंपाशी 
प्रानच मदिरा प्याले...
प्रानच मदिरा प्याले, नुरला--
---दूर नदीचा पुल 
भूलच सगळी भूल
धुलिंत हरवला चन्द्र कुणाचा 
धुलच झाली फूल...

-ग्रेस 

No comments:

Post a Comment