Sunday, December 18, 2011

स्वप्नचित्र
गाण्याच्या काठावर 
नारिंगी चंद्र हळू झुकलेला ,
रूमझुमत्या झाडांतून,
शब्दांविण अर्थ गहन पिकलेला.

वाऱ्याच्या बोटांवर 
दवओल्या गवताचा मंद वास,
खडकातून पाझरतो 
विरघळल्या जाईचा शुभ्र भास.

रात्रमग्न डोंगरात 
सोनेरी जाळ मंद झीळमिळतो,
पाण्यातून बिंब हले :
स्वप्नातून रंग जसा झुळझुळतो.

: मंगेश पाडगावकर     

No comments:

Post a Comment