Thursday, December 15, 2011

एक दिवा लाव!


ज्याच्या घरी
अंधार असेल,
अश्रुवाचून काहीच नसेल,त्याच्या घरी
एकदा तरी
एक दिवा लाव!

तेल नाही,
वात नाही;
आधाराचा हात नाही;
त्याच्या घरी
एकदा तरी 
एक दिवा लाव!

No comments:

Post a Comment