Wednesday, December 21, 2011

पावसाचं नेहमी हे असंच असतं




















पावसाचं नेहमी हे असंच असतं. अनाहूतपणे येणं आणि अकस्मितपणे जाणं! सकाळच्या कोवळ्या किरणांनी तशी चुगली केलेली असते, पण सगळेच आपापल्या नादात. त्यांचं कुजबुजणं कोण ऐकणार? दुपारी दिसणाऱ्या कलत्या सावल्याही पावसाची चाहूल घेऊनच आलेल्या असतात. पण मनाच्या बंद कवाडातून त्यांना आत शिरता तरी कसं येणार? हुरहूरत्या कातरवेळी कोसळणाऱ्या सरी क्षणात आपल्यात ओढतात. बेभान पदन्यास करत, आपल्याला नखशिखांत भिजवत, निलाजरेपणानं अंग-प्रत्यंगाशी चुम्बत या धारा आपल्यालाही बेभान करतात. थेंबा-थेंबांशी धसमुसळेपणानं खेळत, पावलांनी तुषार उडवत, चेहऱ्यावरून अलगद निसटणाऱ्या थेंबांना भावपूर्ण निरोप देत आपणही तर झेलतच असतो अंगावर त्याला!

No comments:

Post a Comment