Sunday, December 11, 2011

मनातल्या गाण्यावरपानांतून वाजे वारा 

जसे ओळखीचे  पाय 
ऊन उभे अंगणात 
जशी बांधलेली गाय 

हवेचिया डहाळीला
फुटे पाकळीचा झुला 
फुलपाखराने तसा
झोका कोवळा घेतला

रेघ रेखित पांढरी 
उडे पक्षी पाण्यावर 
झुके किरणांची फांदी 
मनातल्या गाण्यावर.....

: मंगेश पाडगावकर 

No comments:

Post a Comment