Saturday, November 19, 2011

तुझे पांगलेले मन

तुझे पांगलेले मन सांग सांग कसे बांधू
माझे भंगलेले मन सांग सांग कसे सांधू
आले गगन भरुन तसे मन आसवांनी
तुझ्यासाठी परी अडे असे पापण्यांत पाणी
पक्षी भाळला आभाळा वाट मागची विसरे
मौन तुझे तीरसे गे मात्र काळजांत शिरे
सांग सांग कशी तुला पुन्हा बोलकी गे करूं
कसे पिसावलें चित्त आत्ता मुठीत आवरू : बा. भ . बोरकर 

No comments:

Post a Comment