Tuesday, November 22, 2011

कोवळ्या अंधारी

कोवळ्या अंधारी दर्याच्या किनारी
बसते तशीच, एकटी एकटी.
एकटी कशी 
 तुझ्या विचारात्;
तुझ्या विचारात रंगता रंगता
येते मनाला अशी काहीशी ओढाळ मस्ती

पाहती वरून सप्तर्षी चोरून
काढावी खोडी हळूच त्याची;
ओढावी दाढी
व्याध 
-मंगळ -अभिजितांचे
रंगेल खडे आणावे चोरून
तुझ्या शर्टाची होतील बटणे बोटचाळ्याला
कृत्तिकासमूह घेऊन हातात
होऊन अल्लड मांडावा खेळ
सागरगोट्यांचा 
 पांचाखाचाचा
मस्तीत येणार्‍या ताठर लाटेचा
ओढावा पदर्; आणि लपावे वाळुच्या आड
शिरावे थेट दर्याच्या कुशीत
आणि निथळावे अंगावरून खारट पाणी 

पाण्याचे थेंब

अशी काहीशी ओढाळ मस्ती
येते मनाला
तुझ्या विचारात रंगता रंगता : इंदिरा संत 

No comments:

Post a Comment