Sunday, October 30, 2011

कविता शब्दांची ....शब्द वाऱ्यासाठी, वाऱ्यावर विरून जाण्यासाठीही,
शब्द दवाच्या थेंबातल्या  चिमुकल्या आकाशासाठी ,
शब्द झाडाच्या निष्पर्ण एकांतासाठी ,
शब्द काळोखाच्या काठाशी उमलणाऱ्या फुलासाठी .

शब्द जीवापाड जपलेल्या ओझरत्या अंगभेटीसाठी,
शब्द पावलांना गुदगुल्या करणाऱ्या कोवळ्या लाटेसाठी,
शब्द पाण्याकाठ्च्या चांदण्याच्या देवळासाठी,
शब्द गाभारातल्या फुलांच्या ओल्या वासासाठी.

शब्द खोल कळलेल्या समजूतदार दुखासाठी,
शब्द निष्पापांच्या घावावर बांधण्यासाठी,
शब्द कालच्या काळोखाच्या विध्वंसासाठी ,
शब्द नव्या पहाटेच्या दुर्दम्य आश्वासनासाठी

शब्द अंतर्यामीच्या निःशब्द साक्षित्वासाठी,
शब्द कान्हापुढे मायेने बोबडे होण्यासाठी

: मंगेश पाडगावकर 

दिवस तुझेमाझे.....सरीत सोनचाफा 
भुलून भिजण्याचे 
दिवस तुझेमाझे,
प्राणांत अचानक 
सुगंध भरण्याचे 
दिवस तुझे माझे....


बोलता बोलता श्वास 
घालू लागले उखाणे,
चालता चालता वाट 
पावलात झाली गाणे 


लाजत सोनउन्हे
मातीत रूजण्याचे 
दिवस तुझेमाझे , 
सरीत सोनचाफा 
भुलून भिजण्याचे 
दिवस तुझेमाझे,


सर झेलीत झेलीत 
एक पाखरू उडाले ,
तारू ओल्या किरणांचे 
निळ्या स्वप्नात बुडाले.


श्रावणभूलाव्याचे,
आतल्या ओलाव्याचे 
दिवस तुझेमाझे ,
प्राणांत अचानक 
सुगंध भरण्याचे 
दिवस तुझे माझे....


: मंगेश पाडगावकर

तरी...
फांदीफांदीवर
खुणा तुझ्या ;
डोळे मिटले तरी 
नाही मिटले तरी 


फुलाफुलातून 
हाक तुझी ;
गंध दाटला तरी 
नाही दाटला तरी 


रात्र माझ्यासाठी 
होते तुझी ;
हात जुळले तरी 
नाही जुळले तरी 


माझा नाहीस तू 
कशी म्हणू ?
असे म्हटले तरी 
नाही म्हटले तरी 


: मंगेश पाडगावकर

गूढ निळी घनराईगूढ निळी घनराई
अन टपोर चंद्र वरी
घालीत मी हाक तुला 
तू नाहीस जवळ तरी 


गूढ निळी मनराई
हाक तुला आंत आत 
तुजसाठी रात्र जडे 
डोळ्यांतील बाहुल्यांत 


हाकेवर चंद्र असा ;
हाकेवर रात्र अशी 
तू नसूनी जवळ कशी 
डोळ्यांवर पापणीशी !!!!


: मंगेश पाडगावकर

भटके पक्षीभटके पक्षी थव्याथव्यांनी येऊन बसतात  

त्यांच्या उडण्याच्या प्रत्येक कडव्याला देशांतराचे दृवपद
ते बसतात साखळीवर वास्तवाच्या पाय न अडकवता 
त्यांची हुदये त्यांच्या पंखात थरारात असतात 


भटक्या पक्षाना लळा असतो झाडांचा, मातीचा 
गवताच्या हिरव्या समुद्राचा ; पण त्यांचे पंख अटळ ठरतात 
त्यांचे प्रेम बांधीत नाही ; बांधून घेत नाही 
ते आधी भटके असतात, मग पक्षी असतात 


आभाळाच्या समुद्रातून अडू लागतात जेव्हा 
पक्षांची शिडे उभारून हे इवलाश्या गलबतांचे थवे
तेव्हा मी हुदयात भरून घेतो त्यांचा कलकलाट 
त्यांच्या पंखातला थडथडता उत्साह , अटळ गती 


:भटके पक्षी
:मंगेश पाडगावकर