Tuesday, August 24, 2010

ती गेली तेव्हा...

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता 
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता 
तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे 
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता
हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता


कवी: ग्रेस

पाऊसआषाढातील एखादी दुपार असावी. पाऊस घेऊन आलेले श्यामल मेघ मात्र सर्वत्र एकसंध पसरललेले. पण पाऊस नाहीये. थोड्या वेळापूर्वी एक सर येऊन गेलीय. भोवतीच्या झाडावरचे शहारे अजून मावळलेलेसुध्दा नाहीत, तोच दुपारी सर येऊ पाहतेय. ओलसर गंधमय वारा पानापानांतून चवचाल चालीने निघालाय, फांदीफांदीवर मुकाट बसलेले करड्या रंगाचे थवे आणि जवळच असलेल्या पाण्याच्या शांत डोहावरून फक्त एखाद्याच पाखराचे उडत गेलेले चुकार प्रतिबिंब.
हे सगळं वातावरणच येतं ते मुळी उरातल्या सार्या संवदेना चेतवीत. सृष्टीचा हा बदलू पाहणारा साज चोरट्या रसिकाच्या कुतूहलानं बघावा. आपलं असं वेगळेपण ठेवू नये. सृष्टीची ही नवलाई आणि आपण यात सीमारेषा ठेवल्या तर मग संपलंच की सारं. वारा होऊन वाहत यायला हवं आणि वाढलेल्या गवतातलं एकुलतं एक पिवळं फुलपाखरू होता होता नव्या उमलणार्या फुलाला स्पर्शता यायला हवं.

पाऊस ! निसर्गाचा एक उत्कृष्ट विभ्रम. ग्रीष्मानं व्याकुळलेल्या वसुंधरेचं आमंत्रण स्वीकारीत येणारे श्यामल मेघ काळजात घेऊन वावरण्याचं मन ज्याला आहे, त्याला मला काय म्हणायचंय ते समजू शकेल. ज्याला कुणाच्या तरी प्रेमात पडता येतं, ज्याला समरसून झोकून देता येतं आणि ज्याला स्वत:च्या व्यक्तित्वाचा विसर पाडून सृष्टिच्या या भुलभुलय्यात हरवता येतं, तो तर पाऊस जगतोच.
पाऊस जगता यायला हवा. पाऊस भोगता यायला हवा. पाऊस झेलून ज्यांची फक्त शरीरं भिजतात ते कधी पावसात भिजतच नाहीत. ज्यांना हे तुषार काळजापर्यंत जाणवतात, रक्तातले तरंग ज्यांच्या पापणीच्या काठाला येऊन भिडतात, तेच खरं तर पाऊस अनुभवतात. सर्व सृष्टीचा मोहोर, अनाघ्रात गंध मनाचा मोर झुलवत झुलवत झुलतोय आणि पर्युत्सुक स्पर्शाची सारी निमंत्रणं स्वीकारण्यासाठी समोर जिवलगाची ओंजळ डोळ्यांतून विशाल विशाल होतेय. एकमेकांच्या श्वासातून शब्दांचा स्पर्श होण्याआधीच भावनेला वाचा फुटतेय आणि स्वत:च्याही नकळत पुढं पडणारं पाऊल सर्वार्थानं अंतर कमी करत पडू लागलंय. सळसळणारा वारा, इंकारणारी शरीरं आणि भोवतीची ओलेती दुपार : जणू या एकांताचा एक पडदा अलगद गुंफला जातोय. संकोचाची सारी टरफलं गळून पडावीत, असं हे मदिर वातावरण.

आनंदाचे निमित्त - प्रविण दवणे

Thursday, August 19, 2010

विश्वास ठेव

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस 
तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले
हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस 
हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस 
कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद. 
अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको 
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको 
आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव. 
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

Monday, August 16, 2010

आई

आर्त माझ्या पुकाऱ्यात आई !
या मुक्या कोंडमाऱ्यात आई !

डागण्या भास देई जिवाला...
त्या क्षणाच्या निखाऱ्यात आई !

हात पाठीवरी हा कुणाचा ?
वाहत्या सांजवाऱ्यात आई !!

मारतो आसवांतून हाका...
दूरच्या मंद ताऱ्यात आई !

औषधे, भाकरी, देव, पोथी ...
मज दिसे याच साऱ्यात आई !

शोधतो मी...मला सापडेना...
आठवांच्या पसाऱ्यात आई !

काय समजून समजायचे मी ?
बोलते हातवाऱ्यात आई!

श्वास नुसते न येती, न जाती...
वावरे येरझाऱ्यात आई !

मुक्त झाली...किती काळ होती -
यातनांच्या पहाऱ्यात आई !

हे खरे...पान पिकलेच होते...
ती पहा त्या धुमाऱ्यात आई !!


: प्रदीप कुलकर्णी

Sunday, August 15, 2010

धुआरी

उदासीन मन 
झाले का ये वेळी
आणिकांचे मेळी 
सुख न ये 

 उसळले ढग
 आभाळ भरून 
आले अंधारून
 जग सारे


 कोसळे पाउस
 सरीवर सरी 
दाटली धुआरी
 चोहुकडे 

 तुझा ये आठव 
अश्या अवसरी
 मूर्ति चितांतरी 
उभी राहे 

 जगात राहून 
जगास पारखा
 आठवी सारखा 
प्रेम तुझे

 : अनिल

Saturday, August 14, 2010

उद्या

उद्या उद्या तुझ्यामध्येच
 फाकणार न उद्या 
तुझ्यामध्येच संपणार 
ना कधीतरी निशा 

 उद्या तुझी धरून कास
 आज कार्य आखले 
तुझ्यावरी विसंबुनी 
 कितीक काम टाकले 

 उद्या तुझ्याचसाठी
 आज आजचे न पाहतो
 तुझ्याचकडे लावुनी 
सद्देव दृष्टी राहतो

 उद्या तुझ्यासवे 
निवांत आजचा अशांत मी
 उद्या तुझ्यामुळेच जिवंत 
आजचा निराश मी

: अनिल

श्रावणझड

श्रावणझड बाहेर मी अंतरी भिजलेला 
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला 
 अभ्रांचा हुदयभार थेंब थेंब पाझरतो
 विझलेला लांबदिवस चिंब होत ओसरतो 
उधळ उधळ पल्वलात संगळून जळ बसते
 क्षणजीवी वर्तुळात हललेले भासविते
 चळते प्रतिबिंब ज़रा स्थिर राहून थिजताना
 बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना
 रिमझिम ही वारयासह स्थायी लय धरून असे
 संमोहन निद्रतुन शब्द्दाना जाग नसे

: अनिल

आणीबाणी

अश्या काही रात्री गेल्या
 ज्यात काळवंडलो असतो... 
अश्या काही वेळा आल्या 
होतो तसे उरलो नसतो... 

 वादळ असे भरून आले 
तरु भडकणार होते 
लाटा अश्या घेरत होत्या 
काही सावरणार नव्हते...

हरपून जावे भलतीचकडे
 इतके उरले नव्हते भान
 करपून गेलो असतो 
इतके पेटून आले होते रान... 

 असे घडत होते डाव 
असा खेळ उधळून द्यावा
 विरस असे झाले होते 
जीव पूरा विटून जावा... 

कसे निभावून गेलो
 कळत नाही कळत नव्हते 
तसे काही जवळ नव्हते 
नुसते हाती हात होते ...

 : अनिल

Tuesday, August 3, 2010

Character

Character is that which reveals moral purpose, exposing the class of things a man chooses or avoids.

: Aristotle

moral

A man's moral worth is not measured by what his religious beliefs are but rather by what emotional impulses he has received from Nature during his lifetime.

:Albert Einstein

Educated mind

It is the mark of educated mind to be able to entertain a thought without accepting it