Skip to main content

Posts

Showing posts from April, 2010

तेरा मेरा मनवा

तेरा मेरा मनवा कैसे इक होई रे
मैं कहता तू जागत रहियो तू रहता है सोई रे

मैं कहता निर्मोही रहियो तू जाता है मोही रे
जुगन-जुगन समझावत हारा कही न मानत कोई रे

मैं कहता आँखिन देखी तू कहता कागद की देखी
मैं कहता सुर धावन हारी तू राखो उर धायी रे

सतगुरु धारा निर्मल वाहै वा मैं काया धोई रे
कहत कबीर सुनो भई साधो तब ही वैसा होई रे

:कबीर

अश्रूंनाही मोल असतं

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

उगवले नारायण

उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll
उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll
उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll
वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll
हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll
मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll

- बहिणाबाई चौधरी

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाऊं दे मनींचे;
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तूझ्या आवडीचे.

ज्ञात हेतूतील माझ्या
दे गळू मालिन्य,आणि
माझिया अज्ञात टाकी
स्फूर्ति-केंद्री त्वद्‌बियाणे.

राहु दे स्वातंत्र्य माझे
फक्त उच्चारातले गा;
अक्षरा आकार तूझ्या
फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा.

लोभ जीभेचा जळू दे
दे थिजु विद्वेष सारा
द्रौपदीचे सत्व माझ्या
लाभु दे भाषा शरीरा.

जाऊ दे कार्पण्य ’मी’चे
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्रकाट्य़ाची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेउं दे तीतून माते
शब्द तूझा स्पंदनाचे

त्वसृतीचे ओळखू दे
माझिया हाता सुकाणू;
थोर यत्ना शांति दे गा
माझिया वृत्तीत बाणू.

आण तूझ्या लालसेची;
आण लोकांची अभागी;
आणि माझ्या डोळियांची
पापणी ठेवीन जागी.

धैर्य दे अन्‌ नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकुं दे बुद्धीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे;

घेऊ दे आघात तीते
इंद्रियद्वारा जगाचे;
पोळू दे आतून तीते
गा अतींद्रियार्थांचे

आशयाचा तूच स्वामी
शब्दवाही मी भिकारी;
मागण्याला अंत नाही;
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परी म्यां
तूहि कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्‌
तूंच घेणारा स्वभावे!!

- बा. सी. मर्ढेकर


जरा अस्मान झुकले

जरा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

जरा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !

- ना. धो. महानोर

अस्मान कडाडून गेला

ही अशी उडी बघताना,
कर्तव्य म्रुत्यु विस्मरला
बुर्जावर फ़डफ़डलेला,
झाशितील घोडा हसला
वासुदेव बळवंताच्या,
कंठात हर्ष गदगदला
दामोदर डोले वरला,
मदनलाल गाली फ़ुलला
कान्हेरे खुदकन हसला
क्रांतीच्या केतूवरला - "अस्मान कडाडून गेला" "अस्मान कडाडून गेला"

दुनियेत फ़क्त आहेत
विख्यात बहाद्दर दोन
जे गेले आईकरिता,
सागरास पालांडून
हनुमंतानंतर आहे - "ह्या विनायकाचा मान" "ह्या विनायकाचा मान"

- मनमोहन नातू

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू.
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन!'
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी, मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला! ||१||


शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी!
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें!
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला! ||२||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता,…

चैत्र पाडवा

शुभारंभ करी शक गणनेचा
करुनी पराभव दुष्ट जनांचा
शालिवाहन नृपति आठवा
चैत्रमासिचा गुढीपाडवा

किरण कोवळे रविराजाचे
उल्हासित करते मन सर्वांचे
प्रेमभावना मनी साठवा
हेचे सांगतो गुढीपाडवा

घराघरांवर उभारुया गुढी
मनामनांतील सोडून अढी
संदेश असा हा देई मानवा
चैत्र प्रतिप्रदा-गुढीपाडवा

जुन्यास कोणी म्हणते सोने
कालबाह्य ते सोडून देणे
नव्या मनूचे पाईक व्हा
हेच सांगतो गुढीपाडवा

नववर्षाचा सण हा पहिला
वसंत ऋतूने सुरू जाहला
प्रण करुया मनी नवा
हेच सांगतो गुढीपाडवा

- मंगला गोखले

घननिळ

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया

- विद्याधर सीताराम करंदीकर

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।


- नारायण सुर्वे

फुलावर उडती फुलपाखरे

धरू नका ही बरे
फुलावर उडती फुलपाखरे

मजे मजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

हात लावता पंख फाटतील
दोरा बांधून पायही तुटतील
घरी कशी मग सांगा जातील
दूर तयांची घरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होता सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुनी गोजिरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

-अ. ज्ञा. पुराणिक

post scrapcancel

आई, थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार !!
आई, थोर तुझे उपकार !! ध्रु०!!

वदत विनोदें हांसत सोडी !!
कोण दुधाची धार !!१!!

नीज न आली तर गीत म्हने !!
प्रेम जिचे अनिवार !!२!!

येई दुखने तेव्हा मजला!!
कोण करी उपचार!!३!!

कोण कड़ेवर घेऊन फिरवी!!
चित्ती लोभ अपार!!४!!

बाळक दुर्बळ होतों तेव्हा!!
रक्षण केले फार!!५!!

त्वांची शिकाविले वाढविले त्वां!!
आहे मजवर भार!!६!!

स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें!!
होंते वारंवार!!७!!

नित्य करावे साह्य तुला मीं!!
हा माझा अधिकार!!८!!


भास्कर दामोदर पालंदे.

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलाविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!

- ना. धों. महानोर

उरात उरते काही

जो गंध फुलांतून झरतो,
वा-याच्या उरी उतरतो;
होउन लेखणी वारा,
मग भवतालावर लिहितो.

जी वाफ जलाची होते,
ती मनी नभाच्या शिरते,
बेधुंद सरींनी गाणे
धरतीवर उपडे होते.

नभ वा-याचेच असे हे
औदार्य असावे थोर
नि:संग किती घेताना,
देताना नसतो घोर.

मी भरून घेतो सारे
हृदयाच्या काठोकाठ,
शब्दांतून देताना का
पाझरता होतो माठ?

शब्दांतून देऊन सुध्दा
जी उरात उरते काही;
ती प्रेरक शक्ती मजला
जगण्याची देते ग्वाही.


- शेख गुरूजी

हिरकणी

गोपनारी हिरकणी गडा गेली
दूध घालाया परत झणी निघाली
पायथ्याशी ते वसे तीचे गाव
घरी जाया मन घेई पार धाव||ध्रु||

शिवप्रभुंचा निर्बंध एक होता
तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता
सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे
कुठे कोणा जाऊ-न-येऊ द्यावे||१||

सर्व दरवाजे फिरून परत आली
तिला भेटे ना तेथ कुणी वाली
कोण पजील तरी तन्हुल्यास आता
विचारे या बहुदु:ख होय चित्ता||२||

मार्ग सुचला आनंद फार झाला
निघे वेगे मग घरी जावयाला
नसे रक्षक ठेविला जेथ ऐसा
तेथ होता पथ रायागादी खासा||३||

गडा तुटलेला कडा उंच नीट
घरी जाया उतरली पायवाट
पाय चुकता नेमका मृत्यु येई
परी माता टी तेथुनीच जाई||४||

उतारू लगे मन घरी वेधलेले
शुद्ध नाही जरी तनुस लागलेले
अंग खराचाताले वस्त्र फतालेले
आशा वेशे ती घरा प्रति चाले||५||

वृत घडले शिवभूप कर्णि जाता
वदे आनंदे धन्य धन्य माता
काड्या वरती त्या बुरुज बंधियेला
नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला||६||

ऋण

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥

- श्री. दि. इनामदार

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तिरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासी अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सदभावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा

- श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

गदड निळे

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी
पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा
तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना
मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे
नवथर रस रंग गहन करिती नयन ओले
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित
तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले

टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब
वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले

गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले

-बा. भ. बोरकर.

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

-वि. म. कुलकर्णी

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे

जयांना कोणी ना जगती
सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे,
जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा,
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल,
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे,
जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे,
जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी,
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे,
जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे,
जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे,
जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा,
जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे,
जगाला प्रेम अर्पावे

- साने गुरुजी

उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड लढवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

- वसंत बापट

अनाम वीरा

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

- कुसुमाग्रज

दीवटी

आधी होते मी दीवटी
शेतकर्यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मीणमीणती!!

समई केले मला कुणी
देवापुढती नेवोनी
निघुनी आले बाहेर
सोडीत कालासा धूर!!

काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणती
मीच त्यातील प्री ज्योती !!

ब्त्तीचे ते रूप नवे
पुढे मिळाले मज बर्वे
वरात मज वाचून अडे
झ्ग्झ्गाट तो कसा पडे!!

आता झाले मी बीज्ली
घरे मंदीरे ल्ख्ल्ख्ली
देवा ठाउक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे .

एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांला
कसलेही मज रूप मिळो
देह जलो अन् जग उजलो!!

- वी. म. कुलकर्णी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

होते तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाची पाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

- नारायण सुर्वे

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
म…

मृग

माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी

-ग. दि. माडगुळकर

तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
न…

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..

पिलं निजले खोप्यात
जसा झूलता बंगला
तिचा पिलामधि जीव
जीव झाडाले टांगला..!

सुगरिन सुगरिन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा !

तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?

- बहीणाबाई चौधरी

कोठुनि येते मला कळेना

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।

येथे नाही तेथे नाही,
काय पाहिजे मिळावयाला?
कुणीकडे हा झुकतो वारा?
हाका मारी जीव कुणाला?

मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पाडिती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परि ती
दिव्य औषधी कसली त्याला !

- बालकवी

आवडतो मज अफ़ाट सागर

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

-कुसुमाग्रज

फुलपांखरूं

फुलपांखरूं ! छान किती दिसतें । फुलपाखरूं
या वेलीवर । फुलांबरोबर गोड किती हसतें । फुलपांखरूं
पंख चिमुकलें । निळेजांभळे हालवुनी झुलतें । फुलपांखरूं
डोळे बरिक । करिती लुकलुक गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं
मी धरुं जाता । येई न हाता दूरच तें उडते । फुलपांखरूं
- ग.ह.पाटील

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है, उधर के हम हैं |

पहले हर चीज़ थी अपनी मगर अब लगता है
अपने ही घर में, किसी दूसरे घर के हम हैं |

वक़्त के साथ है मिट्टी का सफ़र सदियों से
किसको मालूम, कहाँ के हैं, किधर के हम हैं |

जिस्म से रूह तलक अपने कई आलम हैं
कभी धरती के, कभी चाँद नगर के हम हैं |

चलते रहते हैं कि चलना है मुसाफ़िर का नसीब
सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं |

गिनतियों में ही गिने जाते हैं हर दौर में हम
हर क़लमकार की बेनाम ख़बर के हम हैं |

:निदा फ़ाज़ली

मुझसे तू पूछने आया है वफ़ा के मानी

मुझसे तू पूछने आया है वफ़ा के मानी
ये तेरी सादादिली मार न डाले मुझको

मैं समंदर भी हूँ, मोती भी हूँ, ग़ोताज़न भी
कोई भी नाम मेरा लेके बुला ले मुझको

तूने देखा नहीं आईने से आगे कुछ भी
ख़ुदपरस्ती में कहीं तू न गँवा ले मुझको

कल की बात और है मैं अब सा रहूँ या न रहूँ
जितना जी चाहे तेरा आज सता ले मुझको

ख़ुद को मैं बाँट न डालूँ कहीं दामन-दामन
कर दिया तूने अगर मेरे हवाले मुझको

मैं जो काँटा हूँ तो चल मुझसे बचाकर दामन
मैं हूँ गर फूल तो जूड़े में सजा ले मुझको

मैं खुले दर के किसी घर का हूँ सामाँ प्यारे
तू दबे पाँव कभी आ के चुरा ले मुझको

तर्क-ए-उल्फ़त की क़सम भी कोई होती है क़सम
तू कभी याद तो कर भूलने वाले मुझको

वादा फिर वादा है मैं ज़हर भी पी जाऊँ "क़तील"
शर्त ये है कोई बाँहों में सम्भाले मुझको

:कतील

चिऊताई दार उघड !

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !

गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .

कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .

तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .

दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?

तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्य…

प्रेम

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं
शोधून कधी सापडत नाही मागुन कधी मिळत नाही वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही
आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षाच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात
संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तऱ्हा असतात साऱ्या सारख्याच जीवघेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात
प्रेमाच्या सफल-विफलतेला खरंतर काही महत्त्व नसतं इथल्या जय-पराजयात एकच गहिरं सार्थक असतं
मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं खुल्या सोनेरी ऊन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं
कवी: सुधीर मोघे

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

आपलं जे असतं; ते आपलं असतं आपलं जे नसतं; ते आपलं नसतं हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
आलेला मोहोर; कधी जळुन जातो फुलांचा बहर; कधी गळुन जातो पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
कधी आपलं गाव; आपलं नसतं कधी आपलं नाव; आपलं नसतं अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
पींजऱ्यात कोंडुन; पाखरं आपली होत नाहीत हात बांधुन; हात गुंफले जात नाहीत हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
झाड मुकं दीसलं तरी; गात असतं न दीसणाऱ्या पावसात; मन न्हात असतं कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
कवी: मंगेश पाडगावकर

असे कसे?

पाऊस कोसळे हा अंधारले दिसे
डोळे भरून आले माझे असे कसे?

गेल्या बुडून वाटा गेली बुडून राने
झाले उदास गाणे माझे असे कसे?

या पावलांस लाटा ओढून खोल नेती
हे प्राण ओढ घेती माझे असे कसे?

कां सांग याद येते? एकान्त हा सभोती
हे सूर डोह होती माझे असे कसे?

कवी: मंगेश पाडगावकर.

मैत्रीचे मी कोनेकोपरे धुंडाळून पाहिले

मैत्रीचे मी कोनेकोपरे धुंडाळून पाहिले घट्ट नाती पुन्हा पुन्हा चाचपतच राहिले मनात मने गुंफताना भरून आला जीव वाटले आता दुराव्याची ओलांडली मी शीव प्रत्येक भेटीत पण पुन्हा नवा परिचय पुन्हा पुन्हा संदिग्धता आणि नवे भय गहनगूढ अंधारवाटा पाताळविहिरी खोल क्वचित कुठे तळाशी चुळकाभर ओल स्पर्शातून जाणवणारे काही स्पर्शातीत सूर तेच तरी सुद्धा उमगत नाही गीत रेशीमगाठी काचणा-या, चरत जाणारे व्रण निकराच्या अंतीम क्षणी निमूट होणारे मन :शांता शेळके

आसवांनी मी मला भिजवु कशाला?......

आसवांनी मी मला भिजवु कशाला?...... एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?......
लागले वणवे इथे दाही दिशांना?...... एक माझी आग मी उजवु कशाला?......
मी उन्हाचा सोबती घामेजलेला?...... चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला?.......
रात्र वैर्‍याची पहारा सक्त माझा?...... जागणारे शब्द मी निजवु कशाला?......
मी असा कळदार, कोठेही कधीही........ पावल्या-चवल्यास मी खिजवू कशाला?.......

साय मी खातो, मराठीच्या दुधाची....... मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?.......
कवी : सुरेश भट

अरे संसार संसार

अरे संसार संसार जसा तावा चुल्ह्यावर आधी हाताले चटके तव्हा मीयते भाकर
अरे संसार संसार खोटा कधीं म्हनु नही राउळाच्या कयसाले लोटा कधीं म्हनु नही
अरे संसार संसार नही रडण कुढण येड्या, गयातला हार म्हनु नको रे लोढण
अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड एक तोंडामंदी कडु बाकी अवघा लागे गोड
अरे संसार संसार म्हनु नको रे भीलावा त्याले गोड भीमफुल मधीं गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार शेंग वरतुन काटॆ अरे, वरतुन काटे मधीं चीक्ने सागरगोटे
ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा इचार देतो दु;खाले होकार अन सुखाले नकार
देखा संसार संसार दोन्ही जीवांचा सुधार कधी नगद उधार सुखा दुखाचा बेपार
अरे संसार संसार असा मोठा जादुगार माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार
असा संसार संसार आधी देवाचा इसार माझ्या दैवाचा जोजार मंग जीवाचा आधार
बहिणाबाई

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते... मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

जीव जडुन कोणी प्रेम करायचं थांबतं का?

गाणं जगण्याचं गाणं जगण्याचं मरण येणार म्हणुन कोणी जगायचं थांबतं का? जीव जडुन कोणी प्रेम करायचं थांबतं का?
कशासाठी भयाने ग्रासुन जायचं? फुलाच्या पत्येक क्षणी नासुन जायचं?

सुकुन जाणार म्हणुन फुल फुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणुन कोणि जगायचं थांबतं का? जीव जडुन कोणि प्रेम करायचं थांबतं का?
फुलुन येते संध्याकाळ; रंगाची बाधा होते! निळ्या निळ्या कॄष्णा साठी सगळि सुष्टी राधा होते!

पाउल फसेल म्हणुन कोणि भुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणुन कोणि जगाय्चं थांबतं का? जीव जडुन प्रेम कोणी करायचं थांबतं का?

ठुमरीच्या अंगाने झरा जेंव्हा वाहू लागतो; लाल केशरी सरगम जेंव्हा फांदिवरुन गाउ लागतो!

झडून जाणार म्हणुन झाड झुलायचं थांबतं का? मरण येणार म्हणुन कोणी जगायचं थांबतं का? जीव जडुन कोणि प्रेम करायचं थांबतं का?
येणार असेल मरण तर येऊ द्यावं जमलच तर लाडाने जवळ घ्यावं!

हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का? मरण येणार म्हणुन कोणी जगायचं थांबतं का? जीव जडुन कोणि पेम करायचं थांबतं का?

मंगेश पाडगांवकर.

नीज माझ्या नंदलाला

नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे या झर्‍याचा सूर आता मंद झाला रे झोपल्या गोठयात गाई, साद वा पडसाद नाही पाखरांचा गलबला ही बंद झाला, बंद झाला रे सावल्यांची तीट गाली,चांदण्याला नीज आली रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे नीज रे आनंदकंदा, नीज रे माझ्या मुकुंदा आवरी या घागर्‍यांचा छंदताला, छंदताला रे: मंगेश पाडगांवकर

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे

गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तीरी या, जळ संथ संथ वाहे

भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काही धुंद
त्याच्या समोर पुढती, साक्षात देव आहे

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई
उघडून लोचनांना तो दिव्य रुप पाहे

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा

कवी : मंगेश पाडगावकर

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

कवी : मंगेश पाडगावकर